पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे अंतिम उमेदवार जाहीर.हुंमगाव ग्रामपंचायत बिनविरोध.
कर्जत ता.५ गणेश पवार
कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 89 सदस्यसंख्या असलेल्या जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे अंतरिम माहिती तहसील कार्यालय कर्जत यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी,निवडणूक आयोगाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी 30 डिसेंबर पर्यंत अंतरिम तारीख देण्यात आली होती.तर 31 डिसेंबर रोजी नामांकन अर्जाची छाननी झाली असून चार जानेवारी पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली होती.
अखेर 89 जागांसाठी सुरुवातीला तालुक्यातून निवडणुकीसाठी तब्बल 297 नामांकन अर्ज भरण्यात आले होते,यात नामांकन अर्ज छाननी वेळी 5 अर्ज अवैध ठरवण्यात आले.तर सोमवारी (चार जानेवारी)रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल 111 उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतल्याने,यामध्ये कर्जत तालुक्यातील हुंमगावं ग्रामपंचायतीची सात सदस्यसंख्या साठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने हे सहा ही नामांकन अर्ज बिनविरोध असल्याने हुंमगाव ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे. बाकी 8 ग्रामपंचायत निवडणुकीत 11 सदस्य हे बिनविरोध असल्याचे समोर आले असून प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत निवडणुक रिग्नात तालुक्यात 164 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
तालुक्यातील कुठल्या ग्रामपंचायत साठी किती उमेदवार उभे असणार आहे याचा आढावा आपण ग्राफीकच्या माध्यमातून घेणार आहोत.
1)कोल्हारे ग्रामपंचायत--11 सदस्य संख्या
44 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
01 नामांकन अर्ज अवैध ठरला.
21 नामांकन अर्ज मागे घेतले.
21 निवडणुकीच्या रिंगणात.
एक सदस्य हा बिन विरोध निवडून आला.
2)जिते ग्रामपंचायत--07 सदस्य संख्या
26 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
01 नामांकन अर्ज अवैध ठरला.
16 नामांकन अर्ज मागे घेतले.
04 निवडणुकीच्या रिंगणात.
5 सदस्य हे बिन विरोध निवडून आला.
3)पोशिर ग्रामपंचायत--11 सदस्य संख्या
35 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
01 नामांकन अर्ज अवैध ठरला.
09 नामांकन अर्ज मागे घेतले.
25 निवडणुकीच्या रिंगणात.
4)साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत--11 सदस्य संख्या
46 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
01 नामांकन अर्ज अवैध ठरला.
21 नामांकन अर्ज मागे घेतले.
24 निवडणुकीच्या रिंगणात.
5)हुंमगावं ग्रामपंचायत--07 सदस्य संख्या
06 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
सहा सदस्य हे बिन विरोध.
6)कडाव ग्रामपंचायत--13 सदस्य संख्या
35 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
08 नामांकन अर्ज मागे घेतले.
27 निवडणुकीच्या रिंगणात.
7)वैजनाथ ग्रामपंचायत--09 सदस्य संख्या
35 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
08 नामांकन अर्ज मागे घेतले.
26 निवडणुकीच्या रिंगणात.
8)भिवपुरी ग्रामपंचायत--07 सदस्य संख्या
19 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
08 नामांकन अर्ज मागे घेतले.
07 निवडणुकीच्या रिंगणात.
चार सदस्य हे बिन विरोध.
9)दामत ग्रामपंचायत--13 सदस्य संख्या
52 नामांकन अर्ज प्राप्त झाले..
01 नामांकन अर्ज अवैध ठरला.
20 नामांकन अर्ज मागे घेतले.
30 निवडणुकीच्या रिंगणात.
एक सदस्य हा बिन विरोध निवडून आला.