वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल

**वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी*

*अर्ज करण्याचे आवाहन*

       पुणे, दि.6 :-  खाजगी चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या परिवहन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असल्यास विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

परिवहन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करता येईल. वरील अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डीडी DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा पुणे येथील असावा.

अर्जासोबत अर्जदाराने फोटो व पत्त्याचा पुरावा साक्षांकित केलेला असावा. खाजगी चारचाकीची यादी दिनांक 8 जानेवारी रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्याच दिवशी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा  डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

परिवहन वाहनांची यादी दिनांक 11 जानेवारी रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात डीडी जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. क्रमांक राखून ठेवल्यानंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत शुल्क परत मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000