कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार

कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
___________________________________


दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची झळ आता कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठापर्यंत पोहोचली आहे. जेएनयूच्या घटनेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सोमवारी जेएनयू हल्ल्याविरोधात जाधवपूर विद्यापीठामध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. यावेळी भाजपाची रॅलीही निघत होती. या दोघांची रॅली समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. पोलिसांचे बॅरिकेडही तोडण्यात आले. या दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.