पुणे विभागातील 5 लाख 44 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*पुणे विभागातील 5 लाख  44 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*

        *विभागात कोरोना बाधित 5 लाख 66 हजार 945 रुग्ण*

             *-विभागीय आयुक्त सौरभ राव*

        पुणे,दि.6 :- पुणे विभागातील 5 लाख 44 हजार 47  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 945 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 173  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*पुणे जिल्हा*

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 65 हजार 519 रुग्णांपैकी  3 लाख 51 हजार  251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5  हजार 498 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 770  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.40 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  96.10 टक्के आहे.

*सातारा जिल्हा*

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 674  रुग्णांपैकी 52 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 548 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*सोलापूर जिल्हा*

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 475 रुग्णांपैकी 46 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 876 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  हजार 735  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

*सांगली जिल्हा*

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 688  रुग्णांपैकी 45 हजार 751 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कोल्हापूर जिल्हा*

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 589 रुग्णांपैकी 47  हजार 830 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  49 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 656 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 496,  सातारा जिल्ह्यात 41, सोलापूर जिल्ह्यात 67, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*  

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 860 आहे.  पुणे जिल्हयामध्ये  583, सातारा जिल्हयामध्ये  120, सोलापूर जिल्हयामध्ये  119, सांगली जिल्हयामध्ये 18 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 20 रुग्णांचा समावेश आहे.

*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*

आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 72 हजार 601  नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  66  हजार 945 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 5 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

*****

Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या