स्त्रीवर  केलेले सुंदर लिखाण...*

*स्त्रीवर  केलेले सुंदर लिखाण...*


बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.
ती शहाणीच होती... आधीपासून. आजही आहे.


उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.


ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही.


ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही.


ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे.


ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे.


ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही.


मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी.


आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल..


*मी खरचं नतमस्तक🙏🙏🙏........*