स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत महत्वाचा टप्पा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार जिजामातांच्या भुमिकेत...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 



*स्वराज्यजननी जिजामाता  मालिकेत महत्वाचा टप्पा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार जिजामातांच्या भुमिकेत...*

*पुणे :-* सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांन समोर येतो आहे. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन, शिवबांनी  तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. 

ही मालिका लवकरच महत्वाचा टप्पा गाठणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार आहेत. 

नीना कुलकर्णी सारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊँची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. 

स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. 

या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.

शिवबांची भूमिका 

डॉ. अमोल कोल्हे साकारणार आहेत. कोल्हे यांना शिवबांच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. येत्या भागांमध्ये स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाच्या घटना प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. जावळीचं युद्ध, अफजल खान शिवबांच्या विरोधात विडा उचलतो, औरंगजेब आणि अफजल खानाने मिळून स्वराज्या विरोधात रचलेला कट हे सर्व येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

पाहा महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, 'स्वराज्यजननी जिजामाता!

सोम-शनि, रात्री ८.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image