छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.


यापैकी सुमारे १११ किल्ले छ.शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.


या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश छ.शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हा ही एक उद्देश आहे.


छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी,डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.छ.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले.हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या.तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते.प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती.


घाट व तेथे बांधलेले किल्ले 
अंबाघाट - रसाळगड
कामथाघाट - कांगोरी
कुंडीघाट - मौजगड
कुंभार्ली घाट - जयगड
कुसूर घाट - भिवगड,टाकगड
पिपरी घाट - सुधागड
माताघाट - भवानगड
रणतोंडी घाट - प्रतापगड
विशालगड घाट - विशालगड,माचाळगड
शेवल्या घाट - मानगड
हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते.तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टीही सुरक्षित केली.त्यांनी तेथे प्रत्येक १० ते १२ मैलांवर सागरी किल्ला बांधला.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे ५२ किल्ले होते. पुण्यात ३० डोंगरी व २ भुईकोट असे ३२ किल्ले होते.ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले.


स्वराज्य अजिंक्य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.बारा मावळ क्षेत्रात असलेल्या ८ किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते. ह्यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरही साल्हेर, मुल्हेर रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले. त्यासोबतच त्यांनी सागरी किल्ले किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले.


एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला" किल्ले बहुत जाहले.त्यांच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे."


महाराजांचे उत्तर होते-


जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्यच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाइल पण तो आम्हाला जिंकु शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जूने नवे अशे तीनशे साठ किल्ले आहेत.एक एक किल्ला तो १ वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील.


छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले 
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.


१) कुंवारी किल्ला
२) केळना किल्ला
३) तिकोना किल्ला
४) तुंग किल्ला
५) तोरणा किल्ला
६) दातेगड किल्ला
७) दौलतमंगळ किल्ला
८) नारायणगड किल्ला
९) पुरंधर(पुरंदर) किल्ला
१०) मोरगिरी किल्ला
११) राजगड किल्ला
१२) राजमाची किल्ला
१३) रुद्रमाळ किल्ला
१४) रोहिडा किल्ला
१५) लोहगड किल्ला
१६) वासोटा किल्ला
१७) विसापूर किल्ला
१८) शिवनेरी किल्ला
१९) सिंहगड किल्ला
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्ले 
एकूण ११ किल्ले.
१) कमलगड किल्ला
२) चंदनगड किल्ला
३) ताथवडा किल्ला
४) नांदगिरी किल्ला
५) परळी (सज्जनगड) किल्ला
६ पांडवगड किल्ला
७) महिमानगड किल्ला
८) वंदनगड किल्ला
९) वर्धनगड किल्ला
१०) वैराटगड किल्ला
११) सातारा किल्ला
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले 
यांत ४ किल्ले होते.


१) कसबा कऱ्हाड किल्ला
२) भूषणगड किल्ला
३) मच्छिंद्रगड किल्ला
४) वसंतगड किल्ला
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले एकूण १३ किल्ले


१) खेळणा किल्ला
२) गगनगड किल्ला
३) गजेंद्रगड किल्ला
४) पन्हाळा किल्ला
५) पावनगड किल्ला
६) बावडा किल्ला
७) भिवगड किल्ला८) भुदरगड किल्ला
९) भूपाळगड किल्ला
१०) मदनगड किल्ला
११) रांगणा किल्ला
१२) विशाळगड किल्ला
१३) ?
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले  एकूण ५९ किल्ले आहेत.


१) मालवण
२) सिंधुदुर्ग
३) विजयदुर्ग
४) जयदुर्ग
५) रत्नागिरी
६) सुवर्णदुर्ग
७) खांदेरी
८) उंदेरी
९) कुलाबा
१०) राजकोट
११) अंजनवेल
१२) रेवदंडा
१३) रायगड
१४) पाली
१५) कलानिधीगड
१६) आरनाळा
१७) सुरंगगड
१८) मानगड
१९) महिपतगड
२०) महिमंडन
२१) सुमारगड
२२) रसाळगड
२३) कर्नाळा
२४) भोरप
२५) बल्लाळगड
२६) सारंगगड
२७) माणिकगड
२८) सिंदगड
२९) मंडणगड
३०) बाळगड
३१) महिमंतगड
३२) लिंगाणा
३३) प्रचीतगड
३४) समानगड
३५) कांगोरी
३६) प्रतापगड
३७) तळागड
३८) घोसाळगड
३९) बिरवाडी
४०) भैरवगड
४१) प्रबळगड
४२) अवचितगड
४३) कुंभगड
४४) सागरगड
४५) मनोहरगड
४६) सुभानगड
४७) मित्रगड
४८) प्रल्हादगड
४९) मंडणगड
५०) सहनगड
५१) सिकेरागड
५२) वीरगड
५३) महीधरगड
५४) रणगड
५५) सेटगागड
५६) मकरंदगड
५७) भास्करगड
५८) माहुली
५९) कावन्ही
60) पालगड
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले 
आवढा
कणकई
करोला
गडगडा
चांदवड
चावंडस
जवळागड
जीवधन
टणकई
त्र्यंबक
थळागड
पटागड
बाहुला
मनरंजन
मनोहरगड
मार्कंडेयगड
मासणागड
मृगगड
राजपेहर
रामसेज
सबलगड
सिद्धगड
हडसर
हरींद्रगड
हर्षण
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले 
1* साल्हेर 2*मुल्हेर 3*सालोटा 4*मोरागड 5*हरगड 6*न्हावीगड 7*हनुमानगड 8*तांम्रगड 9*मांगीतुंगी 10*पिसोळ 11*डेरमाळ 12*कर्हेगड 13*बिष्टागड 14*दुंधागड 15*अजमेरागड 16*चौल्हेरगड 17*भिलाईगड 18*पिंपळा 19*कंचणा 20*इंद्राई 21*धोडप 22*राजधेर 23*कोळधेर 24*चांदवड 25*प्रेमगीरी


छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले 
(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग)


१) वनगड
२) गहनगड
३) चिमदुर्ग
४) नलदुर्ग
५) मिरागड
६) श्रीमंतदुर्ग
७) श्रीगदनगड
८) नरगुंद
९) महंतगड
१०) कोपलगड
११) बाहदूरबिंडा
१२) व्यंकटगड
१३) गंधर्वगड
१४) ढाकेगड
१५) सुपेगड
१६) पराक्रमगड
१७) कनकादिगड
१८) ब्रम्हगड
१९) चित्रदुर्ग
२०) प्रसन्नगड
२१) हडपसरगड
२२) कांचनगड
२३) अचलगिरीगड
२४) मंदनगड
२५)?
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले 
१) कोडफोंडे
२) कोट काहूर
३)कोट बकर
४) कोट ब्रम्हनाळ
५) कोट कडवळ
६) कोट अकोले
७) कोट कठर
८) कोट कलबर्गे
९) कोट शिवेश्वर
१०) कोट मंगरुळ
११) कोट कडणार
१२) कोट कृष्णागिरी
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले 
१) कोल्हार
२) ब्रम्हगड
३) वडन्नगड
४) भास्करगड
५) महीपाळगड
६) मृगमदगड
७) आंबेनिराईगड
८) बुधला कोट
९) माणिकगड
१०) नंदीगड
११) गणेशगड
१२) खळगड
१३) हातमंगळगड
१४) मंचकगड
१५) प्रकाशगड
१६) भीमगड
१७) प्रेईवारगड
१८) सोमसेखरगड
१९) मेदगिरीचेनगड
२०) श्रीवर्धनगड
२१) बिदनूरकोट
२२) मलकोल्हारकोट
२३) ठाकूरगड
२४)सरसगड
२५) मल्हारगड
२६) भूमंडलगड
२७) बिरुटकोट
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले 
१) कोटधर्मपुरी
२) हरिहरगड
३) कोटगरुड
४) प्रमोदगड
५) मनोहरगड
६) भवानीदुर्ग
७) कोट अमरापूर
८) कोट कुसूर
९) कोट तळेगिरी
१०) सुंदरगड
११) कोट तळगोंडा
१२) कोट आटनूर
१३) कोट त्रिपादपूरे
१४) कोट दुटानेटी
१५) कोट लखनूर
१६) कळपगड
१७) महिनदीगड
१८) रंजनगड
१९) कोट आलूर
२०) कोट शामल
२१) कोट विराडे
२२) कोट चंद्रमाल
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले 
१) जगदेवगड
२) सुदर्शनगड
३) रमणगड
४) नंदीगड
५) प्रबळगड
६) बहिरवगड
७) वारुणगड
८) महाराजगड
९) सिद्धगड
१०) जवादीगड
११) मार्तंडगड
१२) मंगळगड
१३) गगनगड
१४) कृष्णगिरी
१५) मल्लिकार्जुनगड
१६) कस्तूरीगड
१७) दीर्घपलीगड
१८) रामगड
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले 
१) कोट आरकट
२) कोट लखनूर
३) कोट पळणापट्टण
४) कोट त्रिमल
५) कोट त्रिवादी
६) पाळे कोट
७) कोट त्रिकोनदुर्ग
८) कैलासगड
९) चंजिवरा कोट
१०) कोट वृंदावन
११) चेतपाव्हली
१२) कोलबाळगड
१३) रसाळगड
१४) कर्मटगड
१५) यशवंतगड
१६) मुख्यगड
१७) गर्जनगड
१८) मंडविडगड
१९) महिमंडगड
२०) प्राणगड
२१) सामरगड
२२) साजरागड
२३) गोजरागड
२४) दुभेगड
२५) अनूरगड
छ.शिवाजी महारांजाच्या ताब्यात असलेले चंदी प्रांतातील किल्ले 
१) राजगड
२) चेनगड
३) कृष्णागिरी
४) मदोन्मत्तगड
५) आखलूगड
६) काळा कोट