स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवं वळणावर... कीर्तीला मिळणार शुभमची खंबीर साथ?

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


कीर्तीला मिळणार शुभमची खंबीर साथ?

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवं वळणावर 

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर कीर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. कीर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या कीर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. कीर्तीसाठी हा काळ खूपच कसोटीचा आहे. आई-वडिलांचं छत्र नाही. दादा-वहिनी देखिल कामानिमित्ताने परदेशी. त्यामुळे कीर्ती अतिशय दु:खी आहे. खरतर तिच्या शिक्षणाविषयी तिने जीजी अक्कांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच जीजी अक्कांच्या रागाचा कीर्तीला सामना करावा लागतो आहे. अश्या या परिस्थितीत कीर्तिला शुभमची साथ मिळणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असेल. एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असतील.

त्यासाठी पाहायला विसरु नका ‘फुलाला सुगंध मातीचा’ दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image