घन:श्याम पालवे यांचे निधन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


घन:श्याम पालवे यांचे निधन

पुणे : कसबा पेठ येथील रहिवाशी आणि फणी आळी तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते घन:श्याम दशरथ पालवे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत शिक्षक राजेंद्र पालवे व उचित माध्यमच्या संचालिका रेश्मा जीवराज चोले यांचे ते वडील होत.