पुणे प्रवाह न्युज पोर्टल
जमिनीच्या वादातून गौळवाडी हाणामारी
कर्जत दि.१ गणेश पवार कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एक शेतकऱ्याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला या पूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. तर कर्जत मधील मुदे् गावात राहणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला ३० नोंव्हेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
मुंबईतील ठक्कर नामक व्यक्तीने गौळवाडी येथे रितसर खरेदी खत करून जमिन विकत घेतल्या असल्या तरी काही जमिनीवरील सातबारा उत्ताऱ्यावर ललित कांतीलाल सालोशा यांच्या वडिलांचे नाव आहे त्या जागेवर ठक्कर यांनी घेतलेले कंपाउंड सालेश यांनी तोडून झोपडी बांधली होती झोपडी तोडण्यासाठी व तोडलेले कंपाऊंड जोडण्यासाठी ठक्कर यांच्या सांगण्यावरून ३ नोव्हेंबर रोजी चारचाकी वाहनातून लोखंडी राँड व काठ्या घेऊन २५ ते ३५ वयोगटातील १० - १२ इसम आले होते त्यानी सालेशा यांना बेदम माराहाण केली या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली या नंतर सर्व जण फरार झाले या बाबत सालेशा यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली सर्व जण अनोळखी असल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान होते कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण भोर आणि अन्य पोलीस शिपायांना आरोपीचा सुगावा लावण्यात यंश आले त्यांनी काही दिवसापूर्वी या टोळीतील दिलीप कमलाकांत दुबे ( ४५ ) याला लोणावळ्यातून अटक केली तर याच गुन्हात सहभागी व बऱ्याच दिवसांपासून फरार असलेल्या मुदे् गावात राहणाऱ्या अनिरुद्ध यंशवत पवार ( २८ ) याला पोलीसांनी अटक केली होती त्याला कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्हातील अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे