कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा जैन साहित्याचे पुरोधा साहित्य महर्षि आचार्य श्री हेमचंद्रसूरीश्वरजी यांचा जन्मदिवस

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा जैन साहित्याचे पुरोधा साहित्य महर्षि आचार्य श्री हेमचंद्रसूरीश्वरजी यांचा जन्मदिवस


पुणे :- जैन धर्मात चातुर्मासाचे विशेष महात्म्य आहे. चातुर्मासात जैन साधू-साध्वी एका निश्चित ठिकाणी थांबतात, धर्म आराधना करतात आणि करवितात. कार्तिक पौर्णिमा हा चातुर्मासाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी साधू-साध्वी चातुर्मासकालीन स्थान सोडून इतरत्र विहार करतात. या दिवशी पालिताना (गुजरात) मधील जैन महातीर्थ श्री शत्रुंजय शिखराची तीर्थयात्रा विशेष भावनेने केली जाते.


कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा जैन साहित्याचे पुरोधा साहित्य महर्षि आचार्य श्री हेमचंद्रसूरीश्वरजी यांचा जन्मदिवस. अद्भूत प्रज्ञेमूळे त्यांना ‘कलिकाल सर्वज्ञ’ या नावाने प्रसिद्धी मिळाली. इ.स. तेराव्या शतकातील कालिकाल सर्वज्ञ यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी दीक्षा ग्रहण केली.


या निमित्ताने श्रुतभवन संशोधन केंद्रामध्ये पू. गुरुदेव गणिवर्य श्री वैराग्यरतिविजयजी म.सा. आणि साध्वी श्री नमिवर्षाश्रीजी म.सा. यांच्या सानिध्यात चातुर्मास समापन, शत्रुंजय वंदना आणि कालिकाल सर्वज्ञ यांचे ग्रंथ व साहित्य प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेंद्र बाठिया, ललित गुंदेशा, वर्धमानजी जैन, योगेश शाह, मनोज शाह आणि ओमजी ओसवाल आदि उपस्थित होते.