हिंदरत्न दिपक लोंढे यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जीवनगौरव पुरस्कार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*प्रति,* 


 *मा.मुख्य संपादक* 


 *पुणे प्रवाह पुणे, सांगली करीता..* 


 **  


सांगली :- 'हिंदरत्न' जीवरक्षक मानव.सांगली.(महाराष्ट्र राज्य) ह्या सामाजिक बांधिलकी जपुन सतत समाजसेवा करणाऱ्या आपल्या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा ह्या राष्ट्रीयकृत संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक कवी,गीतकर,लेखक,समाजसेवक हिंदरत्न दिपक लोंढे यांना कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील गोल्डन केअर क्लब,ह्या राष्ट्रीयकृत संस्थेने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीचे औचित्य साधून हिंदरत्न दिपक लोंढे यांना सरदार वल्लभभाई पटेल जीवनगौरव पुरस्कार २०२० हा अत्युच्च मानाचा अलौकिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.हिंदरत्न दिपक लोंढे यांच्या अतुलनीय निस्वार्थ समाजसेवेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत दखल घेतली जात असून आज अखेर त्यांना विविध सरकारी,निमसरकारी,सहकारी आणि खाजगी संस्थांनी २०३ सन्मानपत्र आणि ४५ पेक्षा जास्त अत्युच्च मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा व त्यांच्या सेवाभावी संस्थेचा सन्मान केला आहे..गौरव केला आहे. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी ग्लोबल पिस अवॉर्ड २०२०,डॉ.आंबेडकर सेवा सन्मान पुरस्कार,मदर टेरेसा वर्ल्ड पिस अवॉर्ड २०२०,नॅशनल इंडियन आयकॉन अवॉर्ड २०२०,मदर टेरेसा समाजसेवा पुरस्कार २०२०,डॉ, ए. पी.जे.अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड २०२०, इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड २०२०,अटल सेवा सन्मान पुरस्कार,मानवतेचा दीप स्तंभ पुरस्कार २०२०,एक्सलेन्स अवॉर्ड २०२०,सेवा योद्धा अवॉर्ड,साध्वी विभा मुनी योगा रत्न अवॉर्ड,कर्मवीर पुरस्कार हे अत्युच्च मानाचे अलौकिक पुरस्कार मिळाले असतानांच आज त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त त्यांच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या जीवनगौरव पुरस्काराची भर पडली आहे.


हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदरत्न दिपक लोंढे म्हणाले की सुवर्ण अक्षरांत नोंद करण्यात यावा असा हा सरदार वल्लभभाई पटेल जीवनगौरव पुरस्कार मला त्यांच्या जयंती दिवशी मिळाला आहे.ही माझ्या जीवनातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे.ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आपणा सर्वांना सांगतांना मला अत्यानंद होत आहे.ह्या आनंदात आपणं सर्वांनी सामील व्हावे. ह्या सन्मानाचे,सन्मानपत्रांचे व पुरस्कारांचे खरे हक्कदार आपण आहात.मानाचे मानकरी आहात.त्यामुळे मला मिळालेला हा प्रत्येक पुरस्कार मी माझ्या देशातील सर्व राष्ट्रपुरुष,राष्ट्रसंत आणि देशवासीयांना समर्पित करीत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले आहे.माझ्या देशवासीयांविना ही माझी समाजसेवा अधुरी असल्याचं सांगून ते पुढे म्हणाले की माझ्या देशवासियांच्या प्रेरणेतूनच मी आज समाज सेवेच पवित्र कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडत आहे.त्यांचं पाठबळ, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हाच माझ्या जीवनाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे अस अभिमानाने सांगितले आहे.