पुण्यकन्या‘ ग्रंथासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यकन्या‘ ग्रंथासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन


पुण्यनगरीला समृद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती शब्दबद्ध करणारा ग्रंथ तयार होत असून ऐतिहासिक पुण्यनगरीत जन्माला आलेल्या आणि सद्यस्थितीत पुण्यात किंवा पुण्याबाहेर राहणाऱ्या, तसेच जन्माने पुणेकर नसलेल्या परंतू गेल्या १० वर्षाहून अधिक काळ पुण्यात वास्तव्य असलेल्या आणि कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकारण, संगीत, नाट्य, नृत्य, अभिनय , वृद्ध , पीडित, अनाथ आणि अपंग, गतिमंद, मतिमंदांची सेवा, अशा विविध क्षेत्रात वेगळी, भरीव, उल्लेखनीय आणि समाज उपयोगी कामगिरी करणाऱ्या महिला व मुली यांची माहिती शब्दबद्ध करून ‘पुण्यकन्या‘ या शीर्षका अंतर्गत ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे.


विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करून पुण्याचे नावलौकिकात भर घालणाऱ्या मुली आणि महिलांनी त्यांची माहिती मराठी भाषेत व्यवस्थित लिहून १५ दिवसांचे आत पाठवायची आहे. प्रार्थना सदावर्ते ८५५२०६४०००/ ९३२२२६९५५१ यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.