भारतीय संस्कृती, परंपरा जगभरात लोकप्रिय जगभरातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी पुण्याला प्राधान्य परदेशी विद्यार्थ्यांमार्फत जगभर भारतीय संस्कृतीचा प्रसार प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; 'फिसा'तर्फे परदेशी विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



भारतीय संस्कृती, परंपरा जगभरात लोकप्रिय


जगभरातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी पुण्याला प्राधान्य


परदेशी विद्यार्थ्यांमार्फत जगभर भारतीय संस्कृतीचा प्रसार


प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; 'फिसा'तर्फे परदेशी विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न


पुणे : "भारतात शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमुळे भारतीय संस्कृती व परंपरा जगभर पोहोचण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानामुळे उभय देशातील प्रगतीला हातभार लागत असतो. सूर्यदत्ताला परदेशी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती असून, गेल्या १८ वर्षांपासून सूर्यदत्तामध्ये २५० पेक्षा जास्त परदेशी विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे," असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.


फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल स्टूडंट्स असोसिएशन-पुणेच्या वतीने वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे पुण्यात शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. चोरडिया बोलत होते. या कार्यक्रमाला ५८ देशातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. संस्कृतीतील विविधतेचा उत्सव साजरा करण्याविषयी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी अंतर्भाव देणारा हा सोहळा होता. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल स्टुडंट्स सेंटरचे संचालक प्रा. डॉ. विजय खरे, अफगाणिस्तान कौन्सलेटचे कॉन्सुल जनरल शफीकुल्लाह इब्राहिमी, एलपीसीपीएसचे संस्थापक डॉ. एस. पी. सिंग, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीतील इंटरनॅशनल सेंटरच्या संचालक प्रा. निरुपमा प्रकाश, 'फिसा'चे अध्यक्ष अब्बा ओमर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात अफगाणी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. चाड, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, कॅमरून, युगांडा, केनिया, टांझानिया, दक्षिण सुदान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, येमेन, झांबिया, नायजेरिया, जिबूती, तुर्की, गॅम्बिया, कांगो, दक्षिण आफ्रिका, अंगोला, मलावी, श्रीलंका, नेपाळ, रुवांडा, कझाकस्तान, बुरुंडी, गिनी, लेसोथो, इथिओपिया, मालदीव, युक्रेन, रशिया, आयव्हरी कोस्ट, नायजर, थायलंड, बोत्सवाना, मोझांबिक, गॅबॉन, बेनिन प्रजासत्ताक, स्वाझीलँड, मादागास्कर, एरिट्रिया, इराक, इराण, इजिप्त, मोरोक्को, सोमाली, मॉरिशस, सेशेल्स आदी ५८ देशातील ३०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.


प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी 'अतिथी देवो भव' या भारतीय परंपरेनुसार सर्व परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, सूर्यदत्तमध्ये गेल्या १८ वर्षांपासून परदेशी विद्यार्थी आहेत. आजवर सूर्यदत्तामधून जवळपास २५० विद्यार्थी पदवी घेऊन गेले आहेत. ३३ देशातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांबद्दल सूर्यदत्ता संस्थेला आस्था असून, त्यांच्या सुविधेसाठी सूर्यदत्ता इंटरनॅशनल एज्युकेशनल अँड कल्चरल सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटर अंतर्गत नियमितपणे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी मेळावा, दीक्षांत समारंभ आयोजित करतो. पुण्यात शिकणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक क्रियाकलापांच्या आधाराची आवश्यकता आहे जेणेकरून ते चांगले प्रदर्शन करू शकतील.


डॉ. चोरडिया यांनी सांगितले की, सूर्यदत्त येथील पायाभूत सुविधा परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समधील सर्व पायाभूत सुविधा, मूल्य, परंपरा आणि शैक्षणिक प्रगती अनुभवण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी आमंत्रित केले. त्यातून सूर्यदत्ता आणि परदेशी विद्यार्थी यांच्यातील नाते आणखी दृढ होत जाईल, असा विश्वास वाटतो. प्रा. डॉ. विजय खरे यांनी एसपीपीयूआय इंटरनॅशनल स्टूडंट सेलविषयी परदेशी विद्यार्थ्यांबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना व इतर आवश्यक माहिती माहिती दिली.प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी इतर मान्यवरांनांही सन्मानित केले. त्यामध्ये अध्यक्ष, सचिव व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता.


----------------


फोटो ओळ : 


कोरेगाव पार्क : पदवीदान सोहळ्यावेळी मान्यवरांसोबत पदवीप्राप्त परदेशी विद्यार्थी.