यशस्वी संस्थेतर्फे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टलपिंपरी : दिनांक १५ ऑक्टो. २०२० : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस )च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आल


यावेळी आपल्या मनोगतात संस्थेचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत मार्गदर्शन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन संघर्ष करत राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे संपुर्ण जीवन अनेकांना प्रेरणादायी आहे त्यांच्या जयंती निमित्त सर्वांनी आपल्या आयुष्यात ज्ञानार्जनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अखंड वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन डॉ.मुंढे यांनी यावेळी केले.


याप्रसंगी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून संस्थेतील मोजके अध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.महेश महांकाळ यांनी केले.


फोटो ओळ: वाचन प्रेरणा दिवसानिमित्तआयोजित कार्यक्रमात सोसायटीच्या


इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे


यांच्यासमवेत संस्थेचे अध्यापक व अन्य