संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे:-जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य कायम विद्यार्थी प्रश्नासाठी लढा देत आलेली आहे.कोरोनाच्या काळात आणि अतिवृष्टीनंतर विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी शिष्टमंडळ सोबत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.महामहीम


भगतसिंग कोश्यारी (साहेब) यांची भेट घेतली.यावेळी विविध विद्यार्थी प्रश्नावर सकारत्मक चर्चा झाली.प्रामुख्याने परीक्षा फी, वार्षिक फी, हॉस्टेल फी,या विषयावर चर्चा झाली.मा.राज्यपाल महोदयांनी आज पर्यंत संघटनेने आणि संग्राम शेवाळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन कौतुक केले.शिष्टमंडळ मधील लोकांनी विविध अडचणी राज्यपाल महोदयांना सांगितल्या.मा.राज्यपाल महोदय लवकर या बाबतीत मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (साहेब) यांच्या सोबत बोलणार आहे असे राज्यपाल साहेबांनी सांगितले.तसेच संग्राम शेवाळे यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.संग्राम शेवाळे ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्य,पाठपुरावा, सवांद या माध्यमातून लढा चालू ठेवणार आहेत.यावेळी शिष्टमंडळ मध्ये शुभम मोहिते,हर्षवर्धन पाटील,रविराज खाडे, शिवराज भोसले यांना संग्राम शेवाळे यांनी संधी दिली.असे आमच्या माध्यमांशी बोलताना जनता दल (से) प्रदेश कार्यलय मुंबई सचिव यांनी माहिती दिली.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image