मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलात घट.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलात घट.....


पुणे : टाळेबंदीमुळे चालू वर्षांत मुद्रांक शुल्क विभागाला पुण्यातून मिळणाऱ्या महसुलात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दस्त नोंदणीत वाढ झाल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व शासकीय व्यवहार ठप्प होते.  तसेच याच काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम दस्त नोंदणीवर देखील झाला असून परिणामी महसुलात घट झाल्याचे निरीक्षण आहे. करोना येण्याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नेहमीप्रमाणे दस्त नोंदणी होत महसूल प्राप्त झाला आहे, तर मार्च महिन्यात पहिले १५ दिवस दस्त नोंदणीची कार्यालये सुरू होती. त्यामुळे जानेवारी, 


फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात कमी दस्त नोंद झाले. त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत सर्वाधिक फटका बसला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सध्या पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून जास्त आहे. याशिवाय टाळेबंदीमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आल्याने राज्य सरकारने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या काळात तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या काळात दोन टक्क्यांनी मुद्रांक शुल्कात कपात केली आहे.त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी या सणांच्या दिवसांत सदनिका खरेदी-विक्री वाढण्याची शक्यता आहे.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान