प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही,  बंद करण्याचा विचार सुरू;  आय.सी.एम.आर (I.C.M.R.)ची महत्त्वाची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


.


पुणे :- करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं महत्त्वाची माहिती दिली.


 करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. 


मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आय.सी.एम.आर.चे बलराम भार्गवा यांनी दिली. 


आय.सी.एम.आर.चे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे.


 त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं. 


करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. 


मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आय.सी.एम.आर.नं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. 


करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं. 


प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ?


 या उपचार पद्धतीला अलीकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही प्रयोग- पाहणीच्या तत्त्वावर मान्यता दिली आहे. यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image