सिंगिंग स्टार' अजय-अतुल संगीत सोहळा १८-१९ सप्टेंबरला!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सिंगिंग स्टार' अजय-अतुल संगीत सोहळा १८-१९ सप्टेंबरला!


Or 


स्पर्धक सादर करणार अजय-अतुल यांची गाणी - १८-१९ सप्टेंबर, 'सिंगिंग स्टार' अजय-अतुल संगीत सोहळा!


मुंबई :- अजय आणि अतुल या जोडीनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत. महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आता येतेय सोनी मराठी वाहिनीच्या 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर. 


          कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मधले वीस दिवस सिंगिंग स्टारचं चित्रीकरण बंद होतं आणि आता ते दणक्यात सुरू झालं आहे अजय-अतुलच्या आगमनानं!


         'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून येत्या १८ तारखेला अजय-अतुल विशेष भाग असणार आहे. या विशेष भागात स्पर्धक अजय-अतुल यांच्या गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. इतक्या मोठ्या दिग्गजांसमोर सादरीकरण करण्याबद्दल स्पर्धकांमध्ये उत्साह आणि भीती अशा संमिश्र भावना आहेत. स्पर्धक आणि त्यांचे मेंटॉरने यांनीbअजय-अतुलसाठी खास गाणी तयार केली आहेत. अजय-अतुल ही जोडी खूप दिवसांनंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


      हा विशेष भाग तीन तासांचा असणार आहे आणि यात अजय-अतुल सोनी मराठी वाहिनीचं अभिमान गीतही गाणार आहेत. गुरू ठाकूरनं हे गाणं लिहिलं आहे तर अजय-अतुलनी हे गाणं तालबद्ध केलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्यांदाच येणार असून अजय-अतुलच्या आवाजात थेट सादरीकरण बघणं ही सगळ्यांसाठीच पर्वणी असणार आहे. 


     पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' १८ सप्टेंबर रात्री ९ ते १२ या वेळात, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.