संग्राम शेवाळे यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत पुणे कुलगुरू यांची भेट घेतली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे:कोरोनाच्या काळात सर्व स्तरावर विविध लोकांना अडचणी असतात.तसेच विद्यार्थी यांच्या पण कोरोनाच्या काही अडचणी आहेत याबाबत जनता दल (से) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.संग्राम शेवाळे यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.नितीन कळमळकर (सर) यांची भेट घेतली.


यामध्ये कोरोनाच्या काळात वार्षिक फी यामध्ये ऑनलाईन शिक्षणाला गरजेचे आहे तेवढी फी आकारण्यात यावी,ATKT आणि YD विद्यार्थी यांचा योग्य विचार करावा,अंतिम वर्षाच्या विद्यार्थी यांची सोडून इतर विद्यार्थी यांची परीक्षा फी माघारी देण्यात यावी,वसतिगृहे यांची उर्वरित दिवसांची फी माघारी देण्यात यावी,चुकलेल्या निकालाचे पुन्हा मूल्यमापन होण्यात यावे अश्या मुख्य अडचणी कुलगुरू सर यांच्या समोर मांडल्या.


   कुलगुरू सर असे म्हणाले की या सकारत्मक मागण्या असून याचे राज्य सरकार पातळीवर चर्चा आणि विचार चालू आहे.आणि फी बाबतीत आमचा अभ्यास चालू असून आम्ही योग्य न्याय देणार आहे असे सांगितले.


यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून काही मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडे मांडल्या होत्या त्यातील तीन मागण्या प्रशासनाने मान्य केल्या होत्या.त्यामुळे शेवाळे यांनी संघटनेच्या वतीने आभार मानले.लवकरच आपल्या मागण्या मान्य होतील असे शेवाळे आमच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.