नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


**


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली*


🌸🌹🌺🌷💐🙏🙏


*पिंपरी- चिंचवड*:-* महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास बोकड (वय 60) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (शुक्रवारी) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.


महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत पिंपळे गुरव मधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते. त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते अतिशय जवळचे कार्यकर्ते होते. सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे बोकड काही काळ अध्यक्ष होते. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून रामदास बोकड यांची ओळख होती. समाजातील नागरिकांच्या अडी-अडचणीसाठी ते धावून जात असत. सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास होता.


रामदास बोकड यांना शुक्रवारी त्रास होत होता. त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. रात्री ११ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचे निधन झाले आहे. सांगवीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*