पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर झाली आहे. तामिळनाडू येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अभिमत विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन गौरविले आहे. प्रमोद चव्हाण यांनी टेक्नॉलॉजी विद्या शाखेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये ‘लेअर्ड सॉफ्टवेअर आर्किटेक्चर फॉर हेटेरोजिनीअस डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम्स युजींग हायब्रीड कम्युनिकेशन चॅनेल्स' या विषयावर प्रबंध सादर केला. प्रा. डॉ. रमा देवी, प्रा. डॉ. मुरुगन महालिंगम, डॉ. मुकुल सुतावणे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण आदींनी त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.