रोटरी युवाच्या गणेशोत्सव निर्माल्य खत निर्मिती प्रकल्पाचे मा.आ. मेघाताई कुलकर्णी यंच्या हस्ते उद्घाटन.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


गणेशोत्सवात विविध फुले,फळे,पाने यांचे निर्माल्य तयार होते.याचे संकलन करून त्याचे बारीक तुकडे(श्रेडिंग)करून त्यापासून खत तयार करण्याचा व ते खत मोफत वाटण्याचा प्रकल्प रोटरी युवा गेली ४ वर्ष राबवित आहे.या प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.टँकर पॉइंट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.मेघाताई कुलकर्णी,नगरसेवक जयंत भावे,रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष रो.मनोज धारप,सेक्रेटरी विजय कर्थिक,खजिनदार निनाद जोग,सेवा प्रकल्प डायरेक्टर दिपा बडवे,सहाय्यक प्रांतपाल अभय जबडे,माजी अध्यक्ष रो.श्रीकांत जोशी,रो.आजी कुलकर्णी उपस्थित होते.  


      छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर