माणूसकी टिकविण्यासाठी निष्पाप भावनेने दान करा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे मत:

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुणे शहर शाखेतर्फे देवदासी, पोतराज गोंधळी यांना धान्याचे कीट वाटप   


 


पुणे : निर्सगाचा नियम असा आहे की, आपण एखादी गोष्ट दान केली तर निर्सगाकडून आपल्याला भरभरून मिळत असते. मनुष्य निष्पाप भावनेने समाजात दान करतो त्यातील समाधान समाजामध्ये सौख्य निर्र्माण करते. अशा निष्पाप दानामुळे माणूसकी टिकून राहील आणि माणसामाणसातील नाती दृढ होतील, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.


 


श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून कसबा पेठेतील श्री. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ येथे नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुणे शहर शाखेतर्फे देवदासी, पोतराज व गोंधळी यांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिल्पकार विवेक खटावकर, दगडूशेठ दत्त मंदिराचे विश्वस्त शिरीष मोहीते, संस्थेचे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर यांच्या हस्ते धान्याची किट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, डॉ. धर्मराज साठे, संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. ज्ञानेश्वर पाटसकर, पुणे शहराचे अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, सामाजिक कार्यकर्ते, हणमंत शिंदे, सुरेश लसूणकुटे उपस्थितीत होते. 


 


यावेळी देवदासी, पोतराज, गोंधळी समाजातील कुटुंबाला ६० धान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी ना.स.प. पुणे उपाध्यक्ष प्रदिप खोले, कुंदन गोरटे, विशाल पोरे, रणजित माळवदे, महेश मांढरे, मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, प्रसिद्धी व प्रचार प्रमुख सागर मांढरे, सुभाष पांढरकामे, अक्षय मांढरे, राहुल सुपेकर व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. प्रदिप खोले यांनी प्रास्ताविक केले. मोहन खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेक खटावकर, शिरीष मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. 


 


फोटो ओळ: श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून कसबा पेठेतील श्री. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ येथे देवदासी, पोतराज व गोंधळी यांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान