कोरोनायोद्ध्यांच्या मुलांकरिता रायसोनी समूहातर्फे शिष्यवृत्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोनायोद्ध्यांच्या मुलांकरिता रायसोनी समूहातर्फे शिष्यवृत्ती


 


पुणे : कोरोना महामारीच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोक फ्रंटलाईनला काम करत आहेत. अशा या फ्रंटलाईन कोरोनायोद्ध्यांच्या मुलांसाठी रायसोनी शिक्षण समूहातर्फे विशेष शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. हुशार, गरजू व कोरोना योद्धा मुलांना रायसोनी शिक्षण समूहात ही शिष्यवृत्ती आगामी शैक्षणिक वर्षाकरिता मिळणार आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आज जनतेला आरोग्य व आर्थिक नियोजनाच्या समस्या भेडसावत आहेत. मात्र अशा स्थितीतही डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आदी लोक आपले जीवन धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाच्या लढाईत कार्यरत आहेत.


 


या योद्ध्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने रायसोनी शिक्षण समूहातर्फे ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना कोरोनायोद्ध्यांचे पाल्य असल्याचे, तसेच इतर कागदपत्रे सादर करावे लागतील. या शिष्यवृत्तीसाठी रायसोनी समूहातर्फे एक समिती स्थापण्यात आली असून, त्या समितीमार्फत प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल व पात्र उमेदवारांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल.


 


ही शिष्यवृत्ती केवळ भारतीय विद्यार्थ्यांकरिता असून, नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी आहे. यासाठी सहा लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२० अशी आहे. रायसोनी शिक्षण समूहात कोणत्याही शहरातील महाविद्यालयात ही शिष्यवृत्ती लागू होईल. अधिक माहितीसाठी www.raisoni.net किंवा www.ghraisoni.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image