पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- पुणे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, तसेच माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्याच्या जिद्दीचे, ध्येयापोटीची चिकाटी याबाबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विधार्थी वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रास स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य आदरणीय अभिषेक दादा बोके यांच्याद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय नितीन करमाळकर यांच्याशी चर्चा करून एक निवेदन देऊन केली तसेच ही मागणी व्यवस्थापकीय समिती मध्ये मांडुन नक्की पारित करू असे आश्वासन दिले....