पुणे ग्रामीण भागातील कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अतिशय सकारात्मक निर्णय... आ.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


पुणे दि.१४: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दि.१४ ऑगस्ट, २०२० रोजी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना प्रवक्त्या तथा माजी उपसभापती विधानपरिषद आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. आ.डॉ.गोऱ्हे यांनी काही मुद्यांना हात घेतला यात ◆ पुणे मनपा यांनी कोव्हीड-१९ च्या उपचारासाठी सात हॉस्पिटल १०० टक्के ताब्यात घेतले आहेत अशी काही दैनिकात बातम्या आल्या होत्या याबाबत विचारणा केली. याबाबत उपमुख्यमंत्री यांनी सदरील बातमीत कोणतेही तथ्य नाही. प्रशासनाने ८०% बेड हे कोव्हीड साठी २०% रुग्ण हे इतर व्याधी असलेले रुग्णांसाठी राखीव आहेत. 


◆ पुणे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी एकुण रुग्णांपैकी 23 % रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील पुण्यात येत आहेत. कारण दुसऱ्या जिल्ह्यात पुणे सारखी यंत्रणा नाही म्हणून पुण्यात जे मोठे कोव्हीड सेंटर उभारले जाणार आहे यात ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करण्याची सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास केली. 


◆ भरारी पथक नेमण्यात आले आहेत त्यांची सातत्याने पाठपुरावा करून या काम केले जात आहे याचा आढावा घेण्याची आवश्यकता आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 


◆ आमदार निधीला कट लावला असल्याने कोव्हीड-१९ साठीच्या कामासाठी निधी देऊ शकत नाही याबाबत खंत व्यक्त केली. सर्व आमदारांना निधी उपलब्ध झाला तर नक्कीच कोव्हीड-१९ च्या कामाला निधी उपलब्ध करून देता येईल असे आ.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. याची उपमुख्यमंत्री ना.श्री पवार यांची दखल घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. 


◆ मनरेगाची कामे ग्रामीण भागात १५ ऑगस्ट च्या ग्रामसभेत देण्याचा प्रघात आहे. कोव्हीड-१९ मुळे यावर्षी ग्रामसभा होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग घेऊन कामाच्या यादी घेण्यासाठी आणि पूढील आर्थिक वर्षात मंजुरी देण्याची सूचना देण्याची विनंती आ.डॉ.गोऱ्हे यांनी ना.श्री पवार यांना केली. तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील काळात ग्रामसभा झाल्या नाहीत तरी देखील ग्रामीण भागातील विकासात अडथळा निर्माण होणार नाही असे आश्वासन ना.डॉ.पवार यांनी आ.डॉ.गोऱ्हे यांना दिले. ना.हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून पुर्ण राज्यभरात तंत्रज्ञानाचा ऊपयोग करुन खेडेविकासाच्या कामाला चालना देण्यास मोहिम हाती घेतली जाईल अशी ग्वाही दिली.


सदरील बैठक अतिशय सकारात्मक झाली याबद्दल आ.डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.