पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*मनुवादी विचारांच्या खाली संविधानाला जाऊ देणार नाही* *:लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत निर्धार* --------------------- *प्रवीण तरडे यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन*
पुणे :
'डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांसाठी लिहिलेले संविधान हे मनुस्मृतीच्या खाली आहे असे दाखविण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे यांनी केला असला तरी लोकजनशक्ती पार्टी हे मनुवादी प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही' असा निर्धार आज पक्षाच्या पुणे कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला.लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबाबत निषेधाचा ठराव करण्यात आला. बैठकीनंतर बंडगार्डन पोलीस चौकीत जाऊन प्रवीण तरडे यांच्यावर ऍट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,वरिष्ठ उपाध्यक्ष माधव यादव,प्रवक्ते के सी पवार यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते. ----------------------------