सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.         प्राजक्ताची चाहूल ' मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०. 


' प्राजक्ताची चाहूल ' या साावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डाॅ. प्रा.सतीश शिरसाठ यांच्या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. नितिन करमळकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन संपन्न झाले.


या पुस्तक प्रकाशनाचे वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार हेही उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी या कवितासंग्रहाचे कवि डाॅ. शिरसाठ यांनी मा.कुलगुरू आणि मा. कुलसचिव यांचे स्वागत करून या पुस्तकातील भूमिका स्पष्ट करताना जुनरी या बोलीभाषेतील शब्द, लहेजा यांचा अधिकाधिक वापर या कवितांमध्ये केला असल्याचे सांगितले. निसर्गसौंदर्य, सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी उमेद आणि जिद्द देणे आणि आपल्या कार्याने समाजात आदर्श निर्माण करणा-या काही मान्यवरांना कवितांमधून शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट केले. याचसोबत हया पुस्तकाचे स्वरूप जसे हार्ड काॅपी स्वरूपात आहे तद्वतच ते ऑनलाईन स्वरूपातही असल्याने विनामूल्य अनेकांना ते पाठवून साहित्यप्रसार आणि विचारांचा विस्तार करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. 


प्रा.डाॅ. नितीन करमळकर यांनी डाॅ. शिरसाठ यांच्या या उपक्रमाचे स्वागत करून अशा प्रकारे साहित्य व विचारप्रसार करण्याची गरज प्रतिपादन केली व डाॅ. शिरसाठ यांचे अभिनंदन केले. डाॅ. प्रफुल्ल पवार यांनीही डाॅ. शिरसाठ यांचे अभिनंदन केले. 


कार्यक्रमाच्या शेवटी डाॅ. शिरसाठ यांनी डाॅ. प्रा.करमळकर, डाॅ.पवार, कुलगुरू कार्यालय, विनोद गोसावी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील सर्व सहकारी ,कवितासागर प्रकाशनाचे प्रकाशक डाॅ. सुनील दादा पाटील तसेच आपल्या कुटुंबातील पत्नी व मुलीचे तसेच साहित्य लिखाणात सहकार्य आणि प्रेरणा देणा-या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचे सहकार्याबद्दल आभार मानले.


 


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image