भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; सेन्सेक्स १५ अंकांनी वधारला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: बेंचमार्क निर्देशांकांनी आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी वृद्धी घेतली. निफ्टी ०.१२% किंवा १३.९० अंकांनी वधारला व ११,२१४.०५ अंकांवर थांबला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.०४% किंवा १५.१२ अंकांची वृद्धी घेत तो ३८,०४०.५७ अंकांवर बंद झाला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एशियन पेंट्स (४.६५%), बजाज फायनान्स (३.७४%) आणि बजाज फिनसर्व्ह (२.७७%), युपीएल (३.४९%) आणि इंडसइंड बँक (२.६३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर टायटन कंपनी (२.५०%), एचसीएल टेक (२.१३%) आणि इन्फोसिस (१.९८%), सन फार्मा (१.१७%) आणि एमअँडएम (१.१६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि फार्मा वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स वृद्धीसह बंद झाले. बीएसई मिडकॅपमध्ये १.४६% ची वाढ झाली तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.७८% ची वृद्धी झाली.


 


अदानी ट्रान्समिशन लिमिटेड: अदानी ट्रान्समिश लिमिटेडने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६६.५% ची वृद्धी नोंदवली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२६% ची वृद्धी झाली. परिणामी तिचे मू्ल्य २५२.५० रुपये झाले. तर कंपनीच्या महसुलात १४.४% ची घसरण झाली.


 


महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड: एमअँडएम लिमिटेडच्या स्टॉक्समध्ये १.१६% ची घसरण झाली. त्यांनी ६०२.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ९७% ची घसरण झाली.


 


अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४२३.१ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा महसूल २००३.५ कोटी रुपये झाला. घसरणीनंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये ४.६४% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,००० रुपयांवर व्यापार केला.


 


टाटा कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड: कंपनीच्या शेअर्समध्ये ६.६५% ची वृद्धी झाली व कंपनीने ५१७.०० रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मजबूत उत्पन्नाची नोंद केली. कंपनीचा नेट प्रॉफिट ८२% नी वाढला आणि कामकाजातील महसुलात १३.४४% ची वृद्धी झाली.


 


व्होडाफोन आयडिया लिमिटेड: व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या स्टॉकमध्ये ६.६७% ची वृद्धी झाली व त्यांनी ८.८० रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नेट लॉस २५,४६० कोटी रुपये झाला.


 


भारतीय रुपया: आजच्या व्यापारी सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात वृद्धी झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत ठरून तो ७५य०५ रुपयांच्या मूल्यावर स्थिरावला.


 


जागतिक बाजार: आशियाई बाजारात आजच्या व्यापारी सत्रात घसरणीसह सुरुवात झाली. निक्केई २२५ चे शेअर्स ०.३९% नी घसरले तर हँगसेंग चे शेअर्स १.६०% नी घसरले. तर नॅसडॅकने १.००% ची वृद्धी घेतली व एफटीएसई एमआयबीमध्ये ०.४३% ची घसरण झाली.