रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी पुणे शहर कार्याध्यक्षपदी गौतम गुलाब वानखेडे यांची नियुक्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी


 


 पुणे शहर कार्याध्यक्षपदी गौतम गुलाब वानखेडे यांची नियुक्ती


 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी पुणे शहर कार्याध्यक्षपदी गौतम गुलाब वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे , या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष रामभाऊ कर्वे यांनी दिले .


 


गौतम गुलाब वानखेडे हे भवानी पेठ येथे धम्मपाल संघ येथे राहत असून दलित अल्पसंख्याक सेवा प्रतिष्ठान सहसरचिटणीस , शिवराम तरुण मंडळ ट्रस्ट सदस्य , धम्मपाल सेवा संघाचे उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत असून गेली पंधरा वर्षापासून फुले , शाहू , आंबेडकर चळवळीत कार्यरत आहेत .


 


कामगार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहणार असून कामगार चळवळीत काम करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी पुणे शहर कार्याध्यक्ष गौतम गुलाब वानखेडे यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .


 


त्यांच्या या नियुक्तीचे जितूभाउ गायकवाड , दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस इंद्रजित सकट , राजेश गाडे , किशोर गायकवाड , विनोद लोखंडे , शांतीलाल चव्हाण , हानोख केदारी , अजय उकरंडे व राम कुचेकर यांनी अभिनंदन केले .


 


सोबत - नियुक्तीपत्र व छायाचित्र