तुळशीबाग मंडळाची पूजेची गणेशमूर्ती साकारण्याची ६५ वर्षांची परंपरा कायम- शिल्पकार खटावकर कुटुंबियांची तिसरी पिढी कार्यरत ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


तुळशीबाग मंडळाची पूजेची गणेशमूर्ती साकारण्याची ६५ वर्षांची परंपरा कायम-


शिल्पकार खटावकर कुटुंबियांची तिसरी पिढी कार्यरत ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ


 


पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे गेली ६५ वर्ष गुरूपौर्णिमेनिमित्त गणेशोत्सवातील प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेच्या गणपतीची मूर्ती साकारली जाते. शिल्पकार खटावकरांच्या परिवाराकडून ही गणेशाची मूर्ती गेल्या ६५ वर्षांपासून तयार केली जाते. कलामहर्षी कै. डी. एस. खटावकर सरांपासून सुरु असलेली ही परंपरा त्यांच्या तिसरी पिढीने पण जपली आहे, हे विशेष. 


 


न-हे येथील शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओमध्ये ही मूर्ती साकारण्यात आली. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडीत, गणेश रामलिंग, जितेंद्र अंबासनकर, राजू शिंदे, चकोर सुबंध आदी उपस्थित होते. इतर कार्यकर्ते व्हिडिओ कॉन्फसरींगद्रारे सहभागी झाले होते. प्रख्यात शिल्पकार विवेक खटावकर व त्यांचा मुलगा युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी गणपतीची मूर्ती साकारली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा व संस्कृती मंडळातर्फे जपण्यात करण्यात आली. 


 


परंपरेचा इतिहास सांगताना विवेक खटावकर म्हणाले, कलामहर्षी डी.एस.खटावकर सर अभिनव कला महाविद्यालयात प्राचार्य होते, तेव्हा तुळशीबाग गणपतीची सजावटीची सुरुवात गुरूपौर्णिमेपासून होत असे. सरांचे अभिनवचे विद्यार्थी सरांना गुरुदक्षिणा म्हणून तुळशीबागेच्या गणेशाची निर्मीती करायचे. त्यावेळी कै.अशोक ताम्हणकर, कै.अरूण पाथरे, थोपटे सर, विजय दिक्षीत आदी नामंवत चित्रकार, शिल्पकार यांचा समावेश होता. गणेशाचे विधीवत पूजन करुन मंडळाचे कार्यकर्ते यांची आगामी गणेशोत्सवच्या नियोजन बाबत बैठक होत असे. हीच परंपरा आज ६५ वर्षे झाली तरी कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.


 


* फोटो ओळ : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे गेली ६५ वर्ष गुरूपौर्णिमेनिमित्त गणेशोत्सवातील प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेच्या गणपतीची मूर्ती साकारली जाते. ती साकारताना शिल्पकार विवेक खटावकर                                              नितीन पंडित