गायिका मनीषा निश्चल यांच्याकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


गायिका मनीषा निश्चल यांच्याकडून


पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत


 


पुणे : कोरोनाच्या लढाईत आपल्या प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, या भावनेतून गायिका मनीषा निश्चल यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान सहायता निधी (पीएम केअर फंड) आणि मुख्यमंत्री सहायता निधीला प्रत्येकी ११ हजार याप्रमाणे २२ हजार रुपयांची मदत दिली आहे. आपल्या बहारदार आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मनीषा निश्चल यांचे गाण्यांचे कार्यक्रम लॉकडाऊनमुळे बंद आहेत. परंतु, फेसबुक, युट्युबसह सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रोत्यांना कोरोनापासून दूर राहण्यास काय काळजी घ्यावी, याबाबत जागृती करत असतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत त्यांनी कोरोनाच्या या लढ्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.


 


याबाबत मनीषा निश्चल म्हणाल्या, "कोरोनामुळे आपण सगळे घरात आहोत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशावेळी त्यांना मदत करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. माझा खारीचा वाटा म्हणून या दोन्ही सहायता निधीला मदत दिली आहे. लॉकडाऊननंतर गायक, वाद्यवृंद, संगीतकार यांना बळ देण्यासाठी श्रोत्यांनी तिकिटे काढून कार्यक्रम पाहायला हवेत. माझ्या या योगदानाचे अनुकरण एका व्यक्तीनेही केले तरी माझा प्रयत्न यशस्वी झाल्याचे समाधान लाभेल."


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
मा. श्री. गौतम जैन सामाजिक कार्यकर्ते यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image