शासनाकडून माथेरान बंद असताना वाणिज्य दराने पाण्याची बिले... आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून बिले कमी करण्याचे आश्वासन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


कर्जत,ता.29 गणेश पवार


                          माथेरानमध्ये शासनाने पर्यटन व्यवसाय बंद केला आहे,त्यात माथेरानमध्ये पर्यटन वगळता कोणत्याही स्वरुपातील व्यवसाय या शहरात नाही.त्यामुळे केवळ पर्यटक आले आणि व्यवसाय झाला तर कुटूंब आपला उदरनिर्वाह करू शकतील अशा माथेरान गावातील नागरिकांना पाणी वापराबद्दल वाढीव बिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून देण्यात आली आहेत.दरम्यान, पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने शासनाने पाणी वापराची बिले यात 100 टक्के सूट द्यावी किंवा ती बिले रद्द करून केवळ सरासरी बिले आकारावी अशी मागणी माथेरान लाजिंग बोर्डिंग मालक संघटनेने केली आहे.तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यवसाय बंद असल्याने पाण्याचा वापर केलेला नाही आणि असे असताना देण्यात आलेली बिले अन्यायकारक असून आपण सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणार असे आश्वासन दिले आहे.                        ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने मुंबईपासून सर्वात जवळ असलेले पर्यटन स्थळ 17 मार्च 2020 पासून बंद केले.तेथे बाहेरून कोणीही व्यक्ती शहारात येणार नाही आणि सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.तेंव्हापासून माथेरान हे पर्यटन स्थळ ज्याची संपूर्ण मदार ही येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते.तेथे 17 मार्च पासून एकही पर्यटक फिरकला नाही.त्यामुळे  माथेरानकर यांना दुसरे कोणतेही आर्थिक स्तोत्र नाही,शेती नाही अशा स्थितीत माथेरानची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे.व्यवसाय पूर्णतः ठप्प असल्याने सामान्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.त्यात एकही पर्यटक आला नसल्याने उन्हाळ्यातील मुख्य पर्यटन व्यवसाय नव्हता.त्यामुळे घरगुती लॉजेसमधील खोली देखील चार महिन्यात उघडली गेली नाही.असे असताना माथेरान शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून लॉजिग, बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत लॉज धारक यांना वाणिज्य दराने पाणी वापराची बिले पाठवण्यात आली आहेत.पाण्याचा वापर झालेला  नाही आणि असे असताना देखील जीवन प्राधिकरण कडून वाणिज्य दराने पाणी वापर बिले पाठवली आहेत याविरुद्ध माथेरान लॉजीग, बोर्डिंग मालक संघटना यांचे हातपाय गळून गेले आहेत.आधीच व्यवसाय शून्य आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मनमानी लक्षात घेता घरगुती लाजिंग व्यवसाय करणारे यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.                         त्यामुळे सर्व लॉज धारकांनी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रेरणा सावंत यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.व्यवसाय नसल्याने रूम्स मध्ये राहायला कोणी आले नाही आणि असे असताना जीवन प्राधिकरण कडून पाणी वापराची बिले दिली जात आहेत.हे धक्कादायक असून 17 मार्च नंतर आम्ही रूम्स देखील उघडल्या नसल्याने हा अन्याय आमच्यावर होत असल्याचे निवेदन स्थानिक लोंजिंग चालक मालक संघटना यांच्याकडून नगराध्यक्ष यांना देण्यात आले आहे.संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी या निवेदनाच्या प्रति कर्जत विधानसभा मतदारसंघचे आमदार महेंद्र थोरवे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता शानबाग यांना दिल्या आहेत.तर नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी या प्रकरणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत जीवन प्राधिकरण कडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणी वापर बिलांबाबत आपण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोललो असून लॉजीग, बोर्डिंगचा व्यवसाय करणारे यांच्यावर अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.


सागर पाटील-अध्यक्ष, लाजिंग संघटना


आमच्यावर हा अन्याय असून आम्ही पाण्याचा वापर देखील केला नाही आणि एवढी बिले आली आहेत.त्यात आम्हाला वाणिज्य ऐवजी घरगुती दराने बिले द्यायला हवी होती.


 


प्रेरणा सावंत-नगराध्यक्ष


शहरात चार महिन्यात एकही पर्यटक आला नाही आणि असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून वाणिज्य दराने बिल आकारावी ही खरे तर अन्यायाची भूमिका आहे.मात्र शासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन लॉक डाऊन काळातील पाणी वापर बिले रद्द करावी


किरण शानबाग-शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण


आम्ही वाणिज्य बिलांबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे,त्यांनी निर्णय घेतल्यावर बिलांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ.


महेंद्र थोरवे-आमदार,कर्जत


कोरोना चा फैलाव होऊ नये म्हणून लॉक डाऊन शासनाने घेतला आहे.मग त्या काळात माथेरान पर्यटक आले नाहीत,हे सत्य आहे आणि अशावेळी तेथील संपूर्ण रोजगार आणि व्यवसाय बुडाला आहे.हे माहिती असताना देखील प्राधिकरण अशी वाढीव बिले देणार असेल तर मग त्या अन्यायाला वाचा फोडली जाईल आणि माथेरानकरांना न्याय दिला जाईल.


 


फोटो ओळ 


नगराध्यक्ष सावंत यांच्यासोबत चर्चा करताना लाजिंग बोर्डिंग संघटनेचे पदाधिकारी


 


छायाःः गणेश पवार


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image