संत नामदेव महाराजांचा ६७० वा संजीवन समाधी सोहळा साधेपणाने साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 नामदेव समाजोन्नती परिषद : नामदीप लावून समाजबांधवांतर्फे घरच्या घरी सोहळा साजरा  


 


पुणे : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ७५० वे जयंती वर्षाचे औचित्य साधून नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर संस्थेने कसबा पेठ येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरामध्ये अत्यंत साधेपणाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


 


यावेळी नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहराध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, विशाल पोरे,राहुल सुपेकर, मनोज बारटक्के उपस्थित होते. गुरुजी श्रीकांत कारंजकर यांच्या हस्ते अभिषेक करून अध्यक्ष संदीप लचके, सागर मांढरे व विजय कालेकर यांनी सपत्नीक नामदेव महाराजांची पूजा केली. या सोहळ्याचे ज्ञानेश्वर पाटेकर यांनी चित्रिकरण करून संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात याचे थेट प्रसारण केले व दुपारी १२.०० वाजता सर्वत्र एकाच वेळी फुले वाहून नामदीप लावण्यात आला. 


 


ह.भ.प. रुक्मिणी पारेकर यांनी परिसा भागवतांनी लिहलेला अभंग सादर करून नामदेव रायांची, आरती पसायदान सादर केले. नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे आवाहन केल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे होणारा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा लॉकडाऊनमुळे यावर्षी सार्वजनिकरित्या साजरा न करता प्रत्येक समाजबांधवानी आपापल्या घरीच साजरा केला.


 


*फोटो ओळ - नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर संस्थेने कसबा पेठ येथील श्री. संत नामदेव महाराज मंदिरामध्ये अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थिती मध्ये सोहळा साजरा केला.