पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पावणेसहा लाखांत उभारले पुणे २७ जुलै १९२५ रोजी पूर्णत्वास पोहोचले.
(दै. पुढारीतील लेखा वरुन सदरची माहिती आहे.... यामध्ये पुणे प्रवाह चा कुठल्याही प्रकारची लेखनाशी संबंध नाही.... फक्त वाचकांना माहिती साठी आणि ज्ञानाकरिता)
नव्या स्थानकात तळमजल्यावर २२७१.७२, तर पहिल्या मजल्याव २२००.६६ चौरसमीटर बांधकाम झाले. त्यावेळी संपूर्ण इमारतीचा खर्च ५ लाय ७९ हजार ६६५ रूपये आला. प्लॅटफॉर्मची लांबी, रूंदी लोकसंख्येचा विच करून बांधली होती. १३ कोचची गाडी उभी राहिल, अशी व्यवस्था केली होत त्याकाळात ५ हजार २०० चौरस मीटरचे प्रशस्त पार्कीग उभारण्यात आले भविष्याच्या दृष्टीने बरीच मोठी जागा रिकामी सोडण्यात आली.
पी. विल्सन शिल्पकार
१८५६ मध्ये पुणे रेल्वे स्थानक अतिशय छोटे होते. त्याचा दुर्मिळ फोटो रेल्वे स्थानकावर आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्याकडे हे चित्र आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा इतिहास रेल्वे विभागाकडे नसेल, इतका व्यवस्थितपणे त्यांनी कागदोपत्री जतन केला आहे. खास दै. 'पुढारी'च्या वाचकांसाठी जुन्या कागदपत्रांद्वारे हा इतिहास त्यांनी पुन्हा एकदा जिवंत केला. या वास्तूचा इतिहास हर्षा शहा यांनी लिहिला असून, त्यात पी. विल्सन यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. १९१५ मध्ये तयार केलेले स्टेशनचे पहिले डिझाईन, कर्नलकेनडी, जेम्स बर्कली यांच्या मार्गदर्शनात सह्याद्री डोंगररांगांतून पूर्ण झालेला मार्ग, अशा अनेक तपशीलवार बाबी त्यांनी लिहिल्या आहेत.
लाहोर, पुणे डिझाईन एकसारखे पुणे स्थानकाची वास्तू व लाहोर जंक्शनचे डिझाईन एकसारखे आहे. रेल्वे बोनि काही वर्षांपूर्वी या वास्तूला मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले. तसेच, हेरेल्वेस्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा आराखडाही सुरू आहे. २४ तास सुरू असणारे फुड प्लाझा देशात प्रथम या स्टेशनवर सुरू झाले.ही अन्नसेवा सध्या कोरोनामुळे सध्या बंद आहे.
पुणे रेल्वे स्टेशन चा
आज २७ जुलै २०२० ला ९५ वा वाढदिवस.....
पावणे सहा लाखात उभारले होते त्यावेळी म्हणजे २७ जुलै १९२५ ला पुणे रेल्वे स्टेशन