भारतीय दलित कोब्रा या या संघटनेचे शहराध्यक्ष तसेच ॲड‌. भाई विवेक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी अजय शिंदे यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


#भावपूर्ण_ श्रद्धांजली


Ajay Shinde


#Covid19 #उपचारा_अभावी_लोक_मरत_आहेत


पुण्यात धक्कादायक प्रकार सुरु आहे.


 


पुणे :- सिंहगड रोड परिसरात राहणारे भारतीय दलित कोब्रा या या संघटनेचे शहराध्यक्ष तसेच ॲड‌. भाई विवेक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी अजय शिंदे यांचे निधन झाले आहे. सामाजिक काम करत असताना चित्रपट सृष्टी मध्ये देखील काम करत होते. जूनियर अजय देवगन या नावाने ते परिचित होते. अनेक वेब सिरीज व काही मराठी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.


 


भारतीय दलित कोब्रा च्या आंदोलन उभारणीमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या मुख्य कार्यकर्त्यांपैकी अजय महत्वाचे. झोपडपट्टी धारक, फूटपाथवर राहणारे लोक, रिक्षावाले ,तृतीयपंथी, पालावरची लोक इत्यादी लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. दलित अत्याचाराच्या प्रश्नावर महाराष्ट्र मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनांमध्ये ते सक्रिय सहभागी होते. निळा झेंडा लावून संपूर्ण शहरभर फिरणे ही त्यांची खास ओळख. भाई विवेक चव्हाण हेच त्यांचे सर्वस्व असले तरी प्रत्येक कार्यकर्त्यांचा ते विशेष सन्मान करत. माझ्या बाबतीत त्यांना विशेष प्रेम आदर व आपुलकीची भावना होती. 


 


मागील लॉकडाऊन मध्ये गोरगरीब लोकांना धान्य पुरवण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले होते. शेकडो लोकांना धान्य वाटप करण्यासाठी तो सतत प्रयत्न करत होता.


 


त्याला ताप खोकला सुरू झाला त्यावेळेला तो पुण्यातील सहा पेक्षा अधिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धावपळ करीत होता पण त्याला उपचार मिळाले नाही. सध्या पुण्यात लोक डाऊन सुरू असल्यामुळे मागील दोन दिवसापासून त्याला कुणाला संपर्कही करता आला नाही. 


 


योग्य वेळी उपचार न मिळाल्याने एक चांगला व्यक्ती कार्यकर्ता आपण सर्वांनी गमावले आहे. सरकार दावा करत आहे. सर्वांना उपचार मिळतील. पण तसे होताना दिसत नाही. का होताना दिसत नाही ? याचा जाब आपण सरकारला विचारला हवा.


 


अजय शिंदे यास भारतीय दलित कोब्रा परिवार व रिपब्लिकन युवा मोर्चा व पुणे शहर जिल्हा परिसरातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या विविध पक्ष संघटनांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली