*भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा* _*उपमुख्यमंत्री अजित पवार*_


 


             बारामती, दि. 4 :- शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना ‍भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.


       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे विविध ‍ठिकाणी सुरु असणाऱ्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


         उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची , माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रिडा संकुल, गौतम बाग येथे सुरु असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दित पहाणी करत आवश्यक सूचना केल्या. विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानामध्ये ‍टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी, आसपासचा परिसर सुशोभित करावा, कामाच्या ‍ठिकाणी येणा-या नागरीकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे, अशा सूचना दिल्या.


         यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना विकासकामांकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा, विकासकामे ही दर्जेदार असावीत तसेच आवश्यक असल्यास वाढीव निधीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. ० ० ० ० ० ०


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*