दलित पँथरचा १०० दिवस मदतीचा हात...


 


दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत नडगम यांचा गरजवंतांना मदतीचा हात!


 


पुणे : देशभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसमुळे अनेकांचे हाल झाले. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर तळागाळातील लोकांसाठी एक मदतीचा हात पुढे आला. तब्बल १०० दिवस झोपडपट्टीवासी, बेघर कुटुंब, गरीब मजूर यांना रेशन किट, औषधे, सॅनिटायझर, मास्क आदी देऊन मोलाची मदत दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केली. 


 


त्याचबरोबर गरजवंताना रोज भोजन, रेशन किट, मास्क, सॅनिटायझर या वस्तूंचे वाटप रोज सुरूच आहे. तसेच अनेक ठिकाणी औषध फवारणी देखील करण्यात आली. यावेळी अजय वंदगळ, मुदस्सर शेख, सुनील आंग्रे, भगवान राऊत, किरण ठोंगे, विशाल शेजवळ,शिवा मनने, प्रिन्स कांबळे, ओंकार नडगम, सनी बोले यांनी परिश्रम घेतले.


 


महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपेपर्यंत गरजवंतांना भोजन, अन्नधान्य किट, मास्क, सॅनिटायझर, आदींचे वाटप सुरूच ठेवणार असल्याचे दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image