शिवाजीनगर सोशल मीडिया आघाडीच्या अध्यक्ष पदी निलेश धोत्रे 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये निलेश धोत्रे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर सोशल मीडिया आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अतिशय मेहनतीने आणि सातत्याने संघटन वाढवणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे. 


 


सबका साथ... सबका विकास... ही भारतीय जनता पार्टी ची विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन पुढच्या काळात  नवनियुक्त सहकारी एकत्रित मिळून आपल्या शिवाजीनगर मतदार संघातील जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला.


 


 


यावेळी उपस्थित आमदार सिद्धार्थ शिरोळे रविजी अनासपुरे, पुणे शहर सरचिटणीस राजेश येणपुरे, गणेशजी घोष, पुणे शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे, शि.नगर भाजपा अध्यक्ष रवीजी साळेगावकर, सरचिटणीस  गणेश बगाडे,प्रतुलजी जागडे,योगेशजी बाचल व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.