मागील आठवड्यात सोन्याच्या दरात १.३ टक्क्यांची वृद्धी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ची वृद्धी


 


मुंबई, १३ जुलै २०२०: विविध देशांमध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहेत . परिणामी बाजारातील भावनांनाही धक्का बसला आहे. यामुळेच सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. जागतिक बँकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मागील आठवड्यात सोन्याचे दर वाढले. मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १.३% नी वाढले. आता विषाणूमुळे पुन्हा आर्थिक मंदी निर्माण केल्याने सोने १८०० डॉलरकडे गेले असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


 


साथ पुन्हा एकदा सर्वत्र पसरल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागले गेले आहेत. मागील आठवड्यात डब्ल्यूटीआयच्या कच्च्या तेलाच्या दरात ०.२५ टक्क्यांनी घट झाली. जागतिक अर्थव्यवसस्थेत अत्यंत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशांना कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येने मोठा फटका बसत आहे. साथीच्या आजाराचा परिणाम पाहून पुन्हा एकदा बाजारात कच्च्या तेलाची मागणी घसरलेली दिसून आली.


 


एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए) च्या मते, अमेरिकी कच्च्या तेलाच्या यादीची पातळी अंदाजे ५.७ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढली आहे. कच्च्या तेलाची मागणी कमी होत असल्याने ओपेकने पुढील बैठकीनंतर तेल निर्मितीत कपात जाहीर करावी, अशी अपेक्षा आहे.


 


मागील आठवड्यात एलएमईवरील बेस मेटलच्या दरात वाढ झाली होती. सर्व बेस धातूंपैकी मागील आठवड्यात झिंक हा सर्वाधिक लाभकारक ठरला. गेल्या काही महिन्यांत चीनचे झिंक उत्पादन कमी होते. अलास्का येथील रेड डॉग नावाच्या खाणकाम करणा-या कंपनीच्या मालवाहतुकीच्या दिरंगाईमुळे चीनमधील झिंकचे उत्पादन आधीपासूनच घसरत होते. सलग पाचव्या महिन्यात घट झाल्यामुळे चीनच्या औद्योगिक मागणीवर दबाव निर्माण झाला आहे. विषाणूचा पुन्हा प्रसार होत असल्यामुळे जागतिक मध्यवर्ती बँकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळू शकतो.


 


मागील आठवड्यात एलएमईवरील तांब्याच्या किंमतीत ५ टक्के वाढ झाली. यामुळे शीर्ष तांबे उत्पादकांकडून पुरवठा वाढण्याची चिंता वाढली आहे. चिली हा तांबे उत्पादक देशांपैकी एक आहे, त्यांनी लाल धातूच्या किंमतीत वाढ दर्शवली आहे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image