शेअर बाजारात किरकोळ घसरण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २४ जुलै २०२०: आजच्या व्यापारी सत्रात आयटी, ऊर्जा आणि आरआयएलच्या स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. परिणामी भारतीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. निफ्टी ११ हजारांच्या पातळीपुढे राहिला, मात्र ०.१९% किंवा २१.३० अंकांनी घसरून तो ११,१९४.१५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.०३% किंवा ११.५७ अंकांनी घसरला व ३८,१२८ अंकांवर विसावला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास १५५७ शेअर्स घसरले, १०५५ शेअर्सनी आघाडी घेतली तर १४० शेअर्स स्थिर राहिले. आरआयएल (४.४०%), एचसीएल टेक (४.६९%), टेक महिंद्रा (३.५५%), सन फार्मा (२.१०%) आणि इन्फोसिस (१.४६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर झी एंटरटेनमें (४.८४%), हिंडाल्को (३.४६%), अॅक्सिस बँक (३.२३%), एसबीआय (३.१८%) आणि गेल इंडिया (२.६४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि ऊर्जा क्षेत्र वगळता सर्व सेक्टरल निर्देशांकांमध्ये आज घसरण झाली. बीएसई मिडकॅप ०.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅपदेखील ०.२३% नी घसरला.


 


एशियन पेंट्स: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६७% ची घसरण नोंदवली. तर कंपनीचा महसूल ४२.७% नी घसरला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ०.६३% नी घसरले व त्यांनी १,७१७.०० रुपयांवर व्यापार केला.


 


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: कंपनीच्या अंशत: पेड शेअर्स आणि पूर्ण पेड शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवलाने १४ लाख कोटींचा आकडा यशस्वीत्या ओलांडला. त्यामुळे हा आकडा पार करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीचे स्टॉक्स ४.४% नी वाढले व त्यांनी २,१४८.४० रुपयांवर व्यापार केला.


 


पीएनबी हौसिंग फायनान्स: पीएनबी हौसिंग फायनान्सचे स्टॉक्स ५% नी वाढले व त्यांनी २२०.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात घसरण होऊनही सलग दुस-या दिवशी शेअरचे मूल्य वधारले. कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात ९.५% ची घट दर्शवली.


 


हिरो मोटोकॉर्प: कंपनीने अॅथर एनर्जीमध्ये ३४.५८% ची शेअर होल्डिंग घेत ८४ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. तथापि, कंपनीचे स्टॉक्स १.१६% नी घसरले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात २,७३९.०० रुपयांवर व्यापार केला.


 


भारतीय रुपया: भारतीय रुपयाने आजच्या व्यापारी सत्रात काहीशी घसरण घेत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.८२ रुपयांचे मूल्य कमावले.


 


सोने: आजच्या व्यापारी सत्रात सोने स्थिर राहिले. वाढत्या अमेरिका-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार महागाईला पर्याय शोधत असल्यामुळे पिवळ्या धातूसाठी सर्वोत्कृष्ट आठवडा ठरण्याचा काळ आहे.


 


जागतिक बाजार: कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या आणि तीव्र आर्थिक मंदीचे आडाखे यामुळे जागतिक बाजाराच्या ट्रेंडवर नकारात्मक व्यापार झाला. नॅसडॅकमध्ये २.२९%, निक्केई २२५ मध्ये ०.५८% आणि हँगसेंगच्या शेअर्समध्यये २.२१% ची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटनेही आज घसरणीचा व्यापार केला. एफटीएसई १०० चे शेअर्स १.१०% नी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.३८% नी घसरले.