कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने डॅश बोर्ड ची सुरुवात...... विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


 


*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित*


 


पुणे, दि.५: कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन करण्यात आला आहे.


 


या डॅश बोर्ड ची सुविधा www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard या लिंक वर संगणकीय प्रणाली द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णालयातील बेड च्या उपलब्धतेची माहिती या डॅश बोर्ड वर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅश बोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल. 


 


नागरिकांना डॅश बोर्ड ची माहिती मोबाईल अँप द्वारे पाहता येण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच ही सुविधा DivCompunebeds या मोबाईल अँप द्वारे देखील एका क्लीक वर पाहता येणे शक्य होणार आहे. यासाठी आय टेक बिझनेस सोल्युशन्स या पुण्यातील कंपनीचे शैलेंद्र फाटक यांनी तांत्रिक काम केले आहे.


      000000


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image