*राष्ट्रवादी चे प्रवक्ते विकास लवांडे राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी इच्छुक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट                                                                                                                 ---------------                                                                                                    *       ------------------                                                                                                            पुणे:  


                                                                                                                             राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस  कॉंग्रेस चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोमवारी समाज माध्यमातून जाहीर केले आहे. 


 


 'राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी माझी योग्यता आहे .सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे .ग्रामीण भागात सेवाभावी व शिक्षण संस्था आहे सामाजिक कार्यकर्ता तसेच साप्ताहिक समाजसत्ता मी मालक व संपादक म्हणून 4 वर्षे अखंड चालवले आहे. पत्रकार म्हणून सुद्धा मी पात्र ठरतो आहे. माझा  पक्षाने विधान परिषद सदस्यत्वासाठी  विचार करावा. पक्षाच्या मूलभूत विचारांशी मी कायम बांधील असलेला व सामाजिक चळवळीतील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ता आहे.कृपया आपली साथ मिळावी.'असे मनोगत  त्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केले आहे .  'मी विधानमंडळाला व समाजाला अभिप्रेत असलेले काम नक्की करू शकतो',असेही विकास लवांडे यांनी म्हटले आहे. 


 


            राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वा च्या १२ जागा असून राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागांसाठी शिफारस करू शकते . दिनांक १५ जून नंतर या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.                                                                                               युवक क्रांती दल ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास करताना समाजातील अन्याय ग्रस्तांसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख विकास लवांडे यांनी या मनोगतात व्यक्त केला आहे .


 


 ' मान -अपमान किंवा पैसा- पद - प्रतिष्ठा याचा कधी विचार केलाच नाही.समाजहितासाठी राजकारण संसदीय लोकशाहीत अटळ असते. संविधानिक निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या कुणीही स्वतःला अराजकीय म्हणवून घेणे भाबडेपणा किंवा चूक आहे.


 मी आदरणीय शरदराव पवार साहेबांवर विश्वास व निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधिलकी ठेवून सक्रिय आहे व कायमच असणार आहे. पवार साहेब म्हणजे  एक व्यक्ती नसून विचार आहेत. सर्वांसाठी ते एक चालत बोलत फिरते  राजकीय विद्यापीठ आहे. मला ते महत्वाचे वाटते ',असेही त्यांनी या मनोगतात म्हटले आहे .                                               -----------                                                                                            *माझी संक्षिप्त कहाणी : विकास* *लवांडे*


 


 पुण्यात फुटपाथवर रात्रंदिवस मुक्काम अशी अनुक्रमे 16-14-26-58 दिवस अन्यायगग्रस्तांना घेऊन मी 4 वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळी 4 दिर्घकाळाची धरणे आंदोलने स्वतः नेतृत्व करत केलेली आहेत. ती यशस्वी सुद्धा झाली होती. हा संघर्षमय अनुभव माझ्यासाठी मोठा कोर्स होता. मला आदरणीय डॉ.कुमार सप्तर्षींचे कायम मार्गदर्शन मोलाचे होते व आहे . (युक्रांद म्हणजे सामाजिक कार्यकर्ता निर्मितीचे केंद्र आहे.माझी विशेष जडणघडण युक्रांदमध्येच झाली.)


 


             तसेच वेगवेगळ्या #शेतकरी प्रश्नांवर अनुक्रमे  8-10-8 दिवस 3 वेगवेगळी उपोषणे आणि 10 दिवस छत्रपती शिवरायांच्या संदर्भात 1 उपोषण केल्याचा यशस्वी अनुभव माझेकडे आहे. तो अनुभव म्हणजे मोठं शिक्षण होते.


स्वशिक्षण म्हणून मी झेडपी , अपक्ष #विधानसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवली. 1991 ते आजअखेर सर्व स्थानिक सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य निवडणूक असो विधानसभा लोकसभा निवडणुकीत प्रचारात हिरीरीने सक्रिय सहभाग घेतलेला आहे.त्यातून मला भरपूर राजकीय शिक्षण मिळाले.


 


   यवतमाळ ते नागपूर शेतकरी प्रश्नांवर खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या  नेतृत्वाखालील 13 दिवसांची राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदयात्रा सुद्धा मला एक महत्वाची अनुभव शिदोरी होती. 


 


       वेगवेगळ्या प्रश्नांवर एकदिवसीय धरणे आंदोलन ,ठिय्या आंदोलन ,रास्ता रोको आणि मोर्चे , दारूबंदीसाठी राज्यव्यापी परिषद  तसेच शासनाकडे विविध अर्ज विनंत्या , वेगवेगळ्या प्रश्नांचा शासनाकडे पाठपुरावा याचा 30 वर्षातील हिशोब नाही. कुणाला हवे असतील तर सर्व पुरावे माझेकडे आहेत.


 


    माझ्या शिंदेवाडी गावात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारणे ,शेतकरी शेतमजुरांच्या मुलामुलींसाठी विनाअनुदानित माध्यमिक शाळा स्थापन करून ती आजअखेर यशस्वीपणे चालवणे , ग्रंथालय , शिंदेवाडी गावची ग्रा.पं. स्थापन करून गावाचा विविध विकास साध्य करण्याचा आजअखेर प्रयत्न चालू आहेच.


 


      मधल्या काळात 4 वर्षे अखंडपणे साप्ताहिक समाजसत्ता पुणे शहर जिल्ह्यात यशस्वीपणे चालवले.


 


      2016 -17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण लोकसंवाद हे व्यासपीठ चालवले.


 


      30 वर्षात अशा विविध कामांमुळे राज्यभर दौरे झाले , फिरणे झाले राज्यात खूप महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या  ओळखी निर्माण झाल्या.विविध संस्था व संघटनांशी जवळून चांगले संबंध निर्माण झाले.


 


     सार्वजनिक जीवन व सामाजिक चळवळीचे काम काय असते ते प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही त्याचे कुठेही विद्यापीठ नाही. तो पदवी कुठंही मिळत नाही. मला ज्या भारतीय समाजाने घडवले त्या समाजाचा मी ऋणी आहे. 


 


       मान -अपमान किंवा पैसा- पद - प्रतिष्ठा याचा कधी विचार केलाच नाही.समाजहितासाठी राजकारण संसदीय लोकशाहीत अटळ असते. संविधानिक निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या कुणीही स्वतःला अराजकीय म्हणवून घेणे भाबडेपणा किंवा चूक आहे.


 


 मी आदरणीय शरदराव पवार साहेबांवर विश्वास व निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधिलकी ठेवून सक्रिय आहे व कायमच असनार आहे. पवार साहेब म्हणजे  एक व्यक्ती नसून विचार आहेत. सर्वांसाठी ते एक चालत बोलत फिरत राजकीय विद्यापीठ आहे. मला ते महत्वाचे वाटते. 


 


        पक्षाने माझेवर विश्वास ठेवून 2016 पासून मला पक्षाची भूमिका व बाजू मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. सर्व माध्यमातून मी अभ्यासपूर्वक व प्रभावीपणे ती भूमिका सतत बजावली आहे व बजावत आहे. त्यामुळे RSS /भाजप यांच्या हिटलिस्टवर मी असणार यात नवल नाही.मला त्याची अजिबात फिकीर नाही. कारण ही लढाई वैचारिक तात्विक आहे. भारतीय संविधान हा आपला सर्वांचा मुख्य धर्मग्रंथ आहे.


 


      माझ्या सर्व लहान मोठ्या नवीन मित्रांसाठी हे अनुभव लेखन थोडक्यात नम्रपणे व्यक्त केले आहे. आपली प्रतिक्रिया मार्गदर्शन सल्ला कायम आहेच.


धन्यवाद ! 


 


(9/5/2020)


जयहिंद ! जय राष्ट्रवादी !


आपला साथी


-------- विकास लवांडे   ----------                                                                                        ----------------------------------------