क्रॅक द कोविड-१९ क्रायसिस' राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये* *'रायसोनी'च्या 'कोविड स्ट्रायकर्स'ला उपविजेतेपद*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*'


 


पुणे : आयबीएम आणि नॅसकॉम फ्युचर स्किल्स यांच्या वतीने आयोजित 'क्रॅक द कोविड-१९ क्रायसिस' या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन हॅकेथॉनमध्ये वाघोली (पुणे) येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या (जीएचआरआयईटी) 'कोविड स्ट्रायकर्स' संघाला उपविजेतेपद मिळाले आहे. स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी 'पॉवर टू व्हॉइस' हा प्रकल्प (ऍप) तयार केले होते. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती वापरून कोरोनासारख्या संकटावर उपाययोजना शोधण्यासाठी या ऑनलाईन हाकेथॉनचे आयोजन केले होते. 


 


प्रा. रचना साबळे व प्रा. पंकज खांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय तोष्णीवाल, सोहम मुनोत, हिमांशू देशमुख, सौरभ चोरडिया या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प केला. देशभरातून २६, ४७८ संघ यामध्ये सहभागी झाले होते. त्यात आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि स्टार्टअप असे एकूण एक लाखांपेक्षा अधिक जणांनी भाग घेतला. तीन फेऱ्यानंतर अतिशय काटेकोरपणे मूल्यांकन होऊन 'रायसोनी'च्या संघाने अंतिम फेरीत उपविजेतेपद पटकावले. कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्यांवर नवोन्मेषांवर आधारित प्रात्यक्षिक व परिणामकारक उपाय शोधण्याचा प्रयत्न यातून झाला. यामध्ये क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) याचा वापर केला गेला.


 


हा संघ आता 'इंटरनॅशनल आयबीएम हॅकेथॉन'मध्ये सहभागी होणार आहे. उत्कृष्ट आणि उपयुक्त अशा या प्रकल्पाचे नॅस्कॉमनेही कौतुक केले आहे. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, श्रेयस रायसोनी, अजित टाटिया, डॉ. आर. डी. खराडकर (संचालक, जीएचआरआयईटी) यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 


 


"शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थलांतरित मजूर यांच्यातील संवाद सुलभ व्हावा, याकरिता प्रकल्प महत्वाचा आहे. देशभर मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न उभा राहिला होता, त्यावर उपाय शोधण्याचे उद्दिष्ट्य यामध्ये होते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी शासकीय कार्यालये आणि रेल्वे स्थानके यांच्यात समन्वय साधण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. या ऍपद्वारे मजुरांच्या लक्षणांचा अभ्यास करून धोक्याचा स्तरही ठरवने शक्य आहे. शिवाय या गरजू स्थलांतरितांना एखाद्या स्वयंसेवी संस्थेला काही मदत करायची असेल, तर तीदेखील शक्य होईल. विशेष म्हणजे या ऍपच्या वापरासाठी स्मार्टफोनची किंवा इंटरनेटची गरज नाही. साध्या फोनवरही याचा वापर शक्य आहे."


- प्रा. रचना साबळे, मार्गदर्शिका


----------------------------------------------------