चीनचा निषेध करीत रंगावलीतून दिला स्वदेशीचा नारा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या वतीने आयोजन


 


पुणे : चीनला धडा शिकविण्यासाठी पुणेकरांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तूंचा स्विकार करा हा संदेश देत स्वदेशीचा स्विकार चिनी वस्तुंचा बहिष्कार या संकल्पनेवर भव्य रंगावली साकारण्यात आली होती. टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही रंगावली साकारण्यात आली.


 


ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र. मंडळीचे अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, सतिश पवार, प्रा.दिलीप शेठ, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर, अमोल साठये, संजय सातपुते, सूर्यकांत पाठक, वैभव वाघ, सचिन जामगे, मंदार रांजेकर, अमर लांडे उपस्थित होते.


 


पराग ठाकूर म्हणाले, स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापरायला हव्यात, हाच चीन विरोधातील भारतीयांचा लढा असेल. चीन ने घुसखोरी केली आणि आपल्या सैनिकांवर गोळ््या झााडल्या. आपण चायनीज वस्तू खरेदी करतो त्यातून येणारे पैसे चीन आपल्या विरुद्ध गोळया चालवायला वापरतो. सीमेवर सैन्य लढेल आपण चायना मेड वस्तूंवर बहिष्कार घालू. बहिष्कार घातल्याने ३ हजार ८०० कोटींचा फटका चीनला बसलाय. त्यामुळे देशभक्त नागरिकांनी स्वदेशीचा स्विकार करा.


 


महेश करपे म्हणाले, चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांची एकजूट आवश्यक आहे. चीनच्या सर्व वस्तूंचा बहिष्कार आपण करायला हवा. स्वदेशी वस्तूंचा वापर करणे हेच चीन ला उत्तर असेल. चीनची आर्थिक बाजू मोडकळीस आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.


 


*फोटो ओळ -ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या वतीने स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वदेशीचा स्विकार चिनी वस्तूंचा बहिष्कार या संकल्पनेवर भव्य रंगावली साकारण्यात आली होती.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)