शेअर बाजारातील तेजीला ब्रेक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, ५ जून २०२०: भारतीय शेअर बाजाराच्या मागील सहा दिवसांतील वृद्धीला गुरुवारी ब्रेक लागला. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्हीही अस्थिर ट्रेडिंग सेशनमध्ये निचांकी स्थानावर बंद झाले. सेन्सेक्स ०.३८ टक्के किंवा १२८.८४ अंकांनी घसरून ३३,९८०.७० अंकांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी ०.३२ टक्के किंवा ३२.४५ अंकांनी घसरून १००२९.१० वर बंद झाला. अर्थात १० हजारांच्या पुढील अंकांवर स्थिरावण्यात तो यशस्वी झाला. देशातील आर्थिक कामकाज पुन्हा सुरू होऊनही निर्देशांकांनी ही घसरणीचा अनुभव घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


 


बहुतांश बँकिंग स्टॉक्सनी लाल रंगात व्यापार केला. यात पीएनबीचा अपवाद होता. या शेअरने २.४८ टक्क्यांनी वृद्धी घेतली. एचडीएफसी बँकेचे स्टॉक २.६७%, बँक ऑफ बडोदाचे शेअर ०.४६%, एसबीआयचे शेअर्स ०.२३% नी तर आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स २.४२ % नी घसरले. आजच्या दिवसात जवळपास ११३२ शेअर्स घसरले, १२८७ शेअर्सनी वृद्धी घेतली तर १५६ शेअर्स पूर्वीच्याच स्थितीत राहिले.


 


वेदांता (७.७०%), टेक महिंद्रा (५.२०%), झी एंटरटेनमेंट (५.५२%), भारती एअरटेल (५.७३%), आणि सन फार्मा (४.१७%) यांचा आजच्या दिवसातील प्रमुख लाभधारकांमध्ये समावेश झाला. तर एशियन पेंट्स (४.६४%), बजाज फायनान्स (४.०४%), इंडसइंड बँक (३.५७%), एचडीएफसी बँक (२.६७%) आणि कोटक महिंद्रा बँक (३.५४%) हे मार्केटमधील टॉप लूझर्स ठरले. निफ्टी बँक वगळता इतर सर्व सेक्टर इंडायसेसनी आज हिरव्या रंगात स्थान मिळवले. निफ्टी बँक २ टक्क्यांनी घसरली.


 


जागतिक बाजारपेठ: युरोपियन शेअर बाजार कोरोना महामारीच्या भीतीने निचांकी स्थितीत सुरू झाला. अमेरिकेतील निदर्शनांनीही गुंतवणुकदारांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागली. जागतिक शेअर बाजाराने तीन दिवसांची वृद्धी आज कायम ठेवली. आज आणखी अनेक देशांनी आर्थिक कामकाजास सुरूवात केल्याने जागतिक शेअर बाजाराने वृद्धी अनुभवली. नॅसडॅक ०.७८%, निक्केई २२५ हा ०.३६% नी, हँगसेंग ०.१७% नी वाढला तर एफटीएसई एमआयबी ०.८८% नी घसरला.