विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांची विप्रो हॉस्‍पीटलला भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे, दिनांक 9- विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी आज हिंजवडी येथील विप्रो हॉस्‍पीटलला भेट देवून पहाणी केली. यावेळी त्‍यांच्‍या समवेत जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार व इतर अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी रुग्‍णालयातील सोयी-सुविधांबाबत समाधान व्‍यक्‍त केले तसेच अधिकाधिक खाटांची संख्‍या वाढविण्‍याबाबत सूचना केली.