सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे १०० नोकरदारांना उच्च शिक्षणासाठी ३० लाखाची शिष्यवृत्ती  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



----------------------- 


'सूर्यदत्ता' देणार १०० नोकरदारांना ३० लाखाची शिष्यवृत्ती


-----------------------


सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे


३० लाखाच्या शिष्यवृत्तीची घोषणा


 


पुणे : "सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मॅनेजर स्तराखालील नोकरदारांना १०० टक्के, तर मॅनेजर व त्यावरील नोकरदारांना ५० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह' अंतर्गत ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे," अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.


 


सुषमा चोरडिया म्हणाल्या, "नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे दहावे वर्ष असून, गेल्या ९ वर्षात १२०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी तीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच २२ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे."


 


"सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदरवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, फॉरेन ट्रेड आदी शाखांमध्ये पीजीडीबीएम, पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, पीजीडीएफएस आदी अभ्यासक्रम शिकता येतील. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील. 


 


या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नावे २० जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी १० ऑगस्ट २०२० नंतर जाहीर होतील. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८९५६९३२४१५/ ८९५६९३२४०५/ ९७६३२६६८२९ यावर संपर्क साधावा.