श्रीमंत राजेघोरपडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन : ३२३ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानवंदना- 


पुणे : स्वराज्यावरील महासंकटाच्या घोर अंधकारातील स्वराज्यनिष्ठ तळपता तारा म्हणजे अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे. श्रीमंत राजेघोरपडे प्रतिष्ठानच्या वतीने अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ३२३ व्या पुण्यतिथीनिमित्त धनकवडी येथे त्यांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक, संकल्पक, संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.


 


यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शेखर पवार, राजेघोरपडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रोहित घोरपडे, आधारस्तंभ गिरीश घोरपडे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अभिवादन देण्यात आले. यावेळी राजेघोरपडे प्रतिष्ठानने बनवलेल्या संताजींच्या पुतळा अनावरणाच्या आणि पोवाडा अनावरणाच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला. 


 


अमित गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूरायानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिवरायांच्या गनिमीकावा युध्दनीतिचा व कडव्या सैनिकी शिस्तीचा अवलंब करुन त्यांनी स्वराज्याला स्थैर्य प्राप्त करुन दिले. तंबूचे कळस कापून औरंगजेबाच्या मनसुब्याला उध्द्वस्त करण्याचे मानसिक बळ त्यांनी मराठ्यांमध्ये निर्माण केले. आणि त्यांच्या याच गौरवशली वारश्याचे सार्थ वाहक हे रोहित घोरपडे व गिरीश घोरपडे आहेत, असेही त्यांनी सांगितले.


 


*फोटो ओळ - श्रीमंत राजेघोरपडे प्रतिष्ठानच्या वतीने अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ३२३ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक, संकल्पक, संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image